‘कोण आहेत राहुल गांधी…पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?’, मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार

‘कोण आहेत राहुल गांधी…पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?’, मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मदी यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. तर या चर्चेपूर्वची वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठी येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे खुल्या चर्चेपूर्वीच वादाने या मुद्याचा श्रीगणेशा झाला आहे.

स्मृती इराणींची जहरी टीका

“राहुल गांधी यांच्यात एका सामान्य भाजप कार्यकर्त्याविरोधात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यामुळे त्यांनी शेखी मिरवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चर्चा करण्यास येऊ इच्छितो, ती व्यक्ती INDIA आघाडीची पंतप्रधान पदाची उमेदवार आहे का?” अशी जहरी टीका स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

राहुल गांधी कोण आहेत?

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी पण काँग्रेसवर पलटवार केला आहे. राहुल गांधी कोण आहेत, जे पंतप्रधानांशी खुली चर्चा करु इच्छितात? असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. INDIA आघाडीची तर चर्चाच नको. त्यांनी अगोदर स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. त्यांनी हे मान्य करावं की, त्यांच्या पक्षाच्या पराभावाला तेच जबाबदार असतील. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना खुल्या चर्चेचे निमंत्रण द्यावं असा टोला तेजस्वी सूर्या यांनी लगावला.

ते तर पंतप्रधानाचा चेहरा पण नाहीत

भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी पण राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याने राहुल गांधी यांचा उत्साह वाढला आहे. खुली चर्चा चांगली आहे. पण सध्याच्या पंतप्रधानांना राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्याचे कारण काय? ते तर काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत आणि INDIA आघाडीचा चेहरा पण नाहीत, अशी टीका मालवीय यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. चांगल्या लोकशाहीसाठी देशातील प्रमुख पक्षांनी एकाच मंचावर आपले धोरण देशासमोर मांडणे एक सकारात्मक पाऊल ठरेल. काँग्रेस या विचारांचे स्वागत करते. तसेच चर्चेचे निमंत्रण स्वीकार करते. देशाच्या पंतप्रधानांनी पण या चर्चेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;