‘आम्ही दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू’; उद्धव ठाकरे कडाडले

‘आम्ही दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू’; उद्धव ठाकरे कडाडले

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तीन टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला. मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी-शाह जोडीवर घणाघात केला.

लोकशाही टिकविण्यासाठी लढा

सध्या लोकशाही टिकविण्यासाठी निकराचा लढा सुरु आहे. हे महाभारत त्यासाठीच सुरु आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी हा लढा सुरु आहे, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. महाराष्ट्रात भगवी लहर आहे. राज्यासह देशात बदल नक्की होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

त्यांना कायमचे पाणी पाजू

मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर मोठी टीका केली. ”दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू.” अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.

देशाला आता जाग आली

‘आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणाने आणि मला बहुतेक सभांतूनही असं जाणवतंय की, आम्ही तर बोलत असतोच, पण लोकांनाही आता सगळं कळलेलं आहे. एखाद्या मुद्याला सुरुवात केली की, लोकच समोरून एकेक विषय बोलत असतात. म्हणजे जागृती हा विषय झालेला आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल माझी रायगडला सभा होती. पूर्वी ते एक नाटक होतं ‘रायगडाला जेव्हा जाग येते.’ आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे, असा दावा ठाकरे यांनी केला.

ते गल्ली-बोळात प्रचार करतील

मी मुद्दामहून आता मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. असा टोला उद्धव टाकरे यांनी लगावला. त्या दोघांनी असा दौरा करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे, असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;