नको तो उल्लेख… नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली

नको तो उल्लेख… नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढला आहे. आता या कलगीतुऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला करताना त्यांची जीभ घसरली. तुम्ही या चिल्लर लोकांना एवढं महत्त्व का देता? माझ्या नजरेची अतिशय चीप दर्जाची महिला आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते. पब्लिसिटीसाठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची म्हणत होती. 10 मिनिटे कॅमेरासमोर तुला दाखवतो असं म्हणाल्यास ती 10 मिनिटे एकटी नाचेल. तिला इथं प्रचाराला बोलावलं. भाजपाला कोणीतरी भूंकणारं हवं आहे. अमरावतीवरून हे पार्सल आणलं आहे आता त्यांची मेहफिल सजेल, असा हल्लाच इम्तियाज जलील यांनी चढवला.

तुम्ही दारूचे दुकान उघडले म्हणून दारूच्या बाटल्या दाखवल्या. निवडणुकीचं चिन्ह दारूची बॉटल ठेवायला पाहिजे होती. प्रचाराला दोनशे दोनशे रुपयांमध्ये आले होते हे मलाही माहीत आहे. बिचारे दोनशे रुपये घेऊन प्रचाराला येणाऱ्या लोकांना दोनशे रुपयात घोषणा द्यायची म्हणून आणले होते. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की दोनशे रुपयात दांडेपण खावे लागतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी विरोधकांना लगावला.

उद्या नक्कीच वाजवणार

शिवसेना म्हणते मोदीला हरवायचं आहे. आम्हाला इथ जिंकायचं. असं कसं चालेल? मी निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे. तळवे चाटण्यामुळे तुमचे अस्तित्व संपले. एकेकाळी म्हणायचे औरंगाबाद हा शिवसेनेचा गड आहे. पण आपण हा गड उचलून टाकला. 2024 ला देशातील सर्वात मोठा जश्न आम्ही करणार.10 असे राज्य आहेत जिथं भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही.उद्या तुमची नक्कीच वाजवणार, असा इशाराच त्यांनी दिला.

याद राखा मी…

असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांची स्तुती केली होती. माझा छोटा भाऊ हा तोफ आहे, असं ओवैसी म्हणाले होते. त्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला होता. अशा तोफा आम्ही घराच्या बाहेर सजावटीसाठी ठेवतो, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं होतं. मोठा म्हणतोय छोटा खतरनाक आहे. पण आम्ही असे खतरनाक घरात पाळतो. याद राखा मी एका सैनिकाची लेक आहे, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;