Arvind Kejriwal : ‘…तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Arvind Kejriwal : ‘…तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

दारु घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अरविंद केजरीवाल यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली. 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर केजरीवाल बाहेर आले आहेत. 2 जूनला पुन्ह त्यांना तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण कराव लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना निवडणूक प्रचारासंदर्भात कुठलीही बंधन घातलेली नाहीत. अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचार, पत्रकार परिषदा घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टालिन तुरुंगात दिसतील” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. “यांनी भाजपाच्या एका नेत्याला सोडलं नाही. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण संपवलं. हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

(बातमी अपडेट होत आहे)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;