Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट, महायुतीमध्ये राड्याची स्थिती, मनसेचा घणाघात ‘औरंगजेबाची औलाद’
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमक पद्धतीची भाषा सुरु आहे.
समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परस्पराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न झाला.
संभाजीनगर क्रांती चौकात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. दुपारी 12 वाजता इथून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याआधी महायुतीचे कार्यकर्ते इथे पोहोचले. त्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List