मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेच सत्य समोर, आयोग Action मोडमध्ये

मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेच सत्य समोर, आयोग Action मोडमध्ये

चार दिवसांपूर्वी देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा होता. बारामती लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही राजकीय लढाई आहे. राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बारामती कुठल्या पवारांचा बालेकिल्ला? हे 4 जूनला निकालानंतर स्पष्ट होईल. पण त्याआधी बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी बरच काही घडलं. बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले होते. यात एका गाडीत काही नोटा पडल्याचं दिसत होतं. रात्रीच्यावेळी एक बँक उघडी ठेवण्यात आली होती, असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांनी ज्या बँकेचा उल्लेख केला, ती पीडीसीसी बँक आहे. रात्रीच्यावेळी बारामतीमध्ये पैसे वाटपासाठी या बँकेचा वापर करण्यात आला, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. आता निवडणूक आयोगाने या आरोपांची दखल घेतली आहे. गरीबांना जी बँक संध्याकाळी पाच वाजता बंद होते, ती मध्यरात्री उघडी कशी? असा सवाल त्यांनी केला होता.


बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?

आता निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पीडीसीसी बँक सुरू ठेवणं, बँक मॅनेजरला महाग पडलं आहे. बँक मॅनेजरवर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल असता 40 ते 50 कर्मचारी आत आढळून आले. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मतदानाच्यादिवशी बारामती लोकसभा मतदारसंघात बराच मोठा ड्रामा घडला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;