Eknath Shinde : पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

Eknath Shinde : पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यांच मतदान झालय. अजून मतदानाचे चार फेज बाकी आहेत. देशात भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. तीन टप्प्याच्या मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिली. “भाजपा 400 पारच स्वप्न पाहतेय. पण उद्धव ठाकरे म्हणतात भाजपाला 50 जागाच मिळणार, राहुल गांधी म्हणतात 100-150 जागाच मिळतील” त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.

“विरोधी पक्षांनी काम केलय का? घरी बसणाऱ्याला कोणी मतदान करतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस-रात्र 20-20 तास काम करतायत. देशाशिवाय दुसरा विचार करत नाहीत. देशाचा विकास, प्रगती मोदींच्या कार्यकाळात झालीय. 2014 आधी बॉम्बस्फोट, घोटाळे व्हायचे. 2014 नंतर बॉम्बस्फोट झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का? पंतप्रधानांवर कुठलाही डाग नाहीय. 2014 आधी यांनी किती घोटाळे केलेत. आज देशात 10 वर्षात राज्यात 2 वर्षात काम झाली आहेत. 50-60 वर्षात काँग्रेसने जे केलं नाही, ते मोदींनी 10 वर्षात करुन दाखवलय. लोक कोणाला मत देणार? लोक काम करणाऱ्याला मत देणार की, काम न करणाऱ्याला?” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘त्यांनी राजकारणाचा स्तर खाली घसरवलाय’

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. “त्यांनी राजकारणाचा स्तर खाली घसरवलाय. हे व्यक्तीगत, जातीनिहाय आरोप आहेत. जनता याला निवडणुकीत उत्तर देईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सॅम पित्रोदा यांनी भारतीयांची चिनी, अरबी, आफ्रिकन लोकांशी तुलना केली होती.


पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर स्थिती काय?

“पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर महायुती बहुमतामध्ये आहे. सर्व पाच टप्प्यात महायुती दमदार प्रदर्शन करेल. महायुती राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकेल. 400 पार या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नामध्ये महायुती महत्त्वाची भूमिका बजावेल” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;