महाराष्ट्राची लूट होतेय, त्यावर राणे-राज जोडीने तोंड उघडलं का? संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्राची लूट होतेय, त्यावर राणे-राज जोडीने तोंड उघडलं का? संजय राऊत यांचा सवाल

कणकवलीतील सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्राची लूट केली जातेय, त्यावर राज ठाकरे आणि राणे जोडीने तोंड उघडले का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.

‘महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन याचे नुकसान करायचे. सध्या मोदी-शहांचे नवीन भक्त झालेले खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला. हे नकली अंधभक्त आहेत, उद्या त्यांची भक्ती बदलू शकते, असेही खासदार राऊत म्हणाले.

मौनी खासदाराचे समर्थन मजबुरीतून

नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात काय दिवे लावले याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱया नेत्यांनी करावा. पक्षांतरे करून मंत्रीपद घेणे हा विकास आहे का असा सवाल करतानाच, मौनी खासदाराचे समर्थन करणे मनसे प्रमुखांची मजबुरी आहे, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;