माझे पांढरे टीशर्ट म्हणजे पारदर्शकता आणि सच्चेपणा… राहुल गांधी यांनी सांगितली पांढऱया रंगाची कहाणी

माझे पांढरे टीशर्ट म्हणजे पारदर्शकता आणि सच्चेपणा… राहुल गांधी यांनी सांगितली पांढऱया रंगाची कहाणी

मला साधेच कपडे आवडतात. पांढरा टीशर्ट मी आवडीने घाललो त्याची कारणे दोन आहेत. हा पांढरा रंग तुमच्यातील पारदर्शकता आणि साधेपणा, सच्चेपणा दाखवतो, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते नेहमी पांढरा टी-शर्टच का घालतात? याचे उत्तर दिले आहे.

याशिवाय आणखी काही हलक्या-फुलक्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी काँग्रेसने सोशल मीडिया चॅनेलवर प्रसृत केलेल्या एका व्हीडीओमध्ये दिली आहेत. यात त्यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष खरगे हेही आहेत. माझ्या मते, विचारसरणीची स्पष्ट समज असल्याशिवाय तुम्ही एक मोठी संघटना म्हणून सत्तेच्या दिशेने जाऊ शकत नाही. आमची विचारसरणी गरीब समर्थक, महिला समर्थक आणि प्रत्येकाला समान वागणूक देणारी आहे हे आम्हाला लोकांना पटवून द्यायचे आहे, असे त्यांनी या व्हीडीओत म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी, प्रचारात तुम्हाला काय आवडते किंवा आवडत नाही असे विचारले आहे. यावर खरगे म्हणाले की, यातील काहीही वाईट नाही. हे चांगलं आहे कारण आपण हे देशासाठी करत आहोत. जे देश बिघडवत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आपण काम करतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. निदान आपण देशासाठी काहीतरी करत असतो.

प्रचाराचा सर्वोत्तम भाग

प्रचाराचा सर्वोत्कृष्ट भाग कुठला असे विचारल्यावर राहुल तत्काळ उद्गारले, प्रचार संपेल तेव्हा! प्रचारादरम्यान भाषणे करणे त्यांना आवडते कारण त्यामुळे ’देशाला कशाची गरज आहे याचा विचार करायला लागतो’, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;