किर्गिस्थान मध्ये अडकले यवतमाळचे 5 विद्यार्थी, पालक चिंतेत; पाल्याना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी

किर्गिस्थान मध्ये अडकले यवतमाळचे 5 विद्यार्थी, पालक चिंतेत; पाल्याना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी

>> प्रसाद नायगावकर 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गिस्थान येथे गेले आहेत. सध्या किर्गिस्थान येथे भारतीय आणि पाकिस्थान येथील विद्यार्थ्यांवर लोकल विद्यार्थी हे हल्ला करीत आहेत. यामध्ये आतापर्यंत चार पाकिस्थानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. सुदैवाने यवतमाळचे हे विद्यार्थी अद्याप सुखरूप आहेत. पण किर्गिस्थान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत . त्यांच्या पालकांनी सरकारला या विद्यार्थाना मायदेशात सुखरूप आणण्याची विनंती केली आहे .

भारतातील असंख्य विदयार्थी हे वैद्यकीय शिक्षणाकरिता आणि इतर अभ्यासक्रमाकरिता परदेशी जातात. अशातच भारतातील जवळपास 14500 विद्यार्थी हे शिक्षणासाठी किर्गिस्थान येथे गेले आहेत. यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे किर्गिस्थानची राजधानी ब्रीस्टेक येथे वैद्यकीय अभ्रासक्रमाकरिता गेले आहेत. दरम्यान लोकल विदयार्थी आणि इजिप्तशिअन विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली . यामुळे लोकल विद्यार्थ्यांनी इतर देशातील विद्यार्थाना सुद्धा आपला निशाणा बनविला आहे . यामुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी यवतमाळचे पालक अतिशय चिंताग्रस्त आहेत

यवतमाळच्या या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच आटपत आहे आणि तिथली परिस्थिती बघता यवतमाळच्या पालकांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच पावले उचलीत या विद्यार्थ्यांना विमानाची व्यवस्था करून मायदेशी परत आणण्याची कळकळीची विनंती केली आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;