जालन्यात अवकाळी पाऊस व वार्‍यांमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान

जालन्यात अवकाळी पाऊस व वार्‍यांमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील विडोळीसह इतर गावांना आज 20 मे रोजी दुपारी अवकाळी वादळ-वार्‍याने झोडपून काढले असून उभे केळीचे बाग झोपले आहेत. तर जाफराबाद तालुक्यातील खासगाव परिसरातील वादळी-वार्‍यांसह पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडाखाली आंब्यांचा सडा पडल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकर्‍यांचे उरले सुरले आर्थिक गणितही बिघडले आहेत. तर अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील शेतकर्‍याच्या गायीवर विज कोसळून गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील विडोळी येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे व वार्‍यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून केळीच्या जमीनदोस्त झाल्या असल्याने येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांवर निसर्ग कोपला असल्याने केळीसह नुकसान झालेल्या फळबागांचे शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार यांनी केली आहे.

सोमवार 20 मे रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान मंठा तालुक्यातील विडोळी,केदार वाकडी,मंगरूळ येथे आणि त्या नंतर पुन्हा एक तासाने जयपूर, एरंडेश्वर,बेलोरा शिवनगिरी,कोकरसा येथे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने शेतकर्‍याची दाणादाण उडून टाकली. या वेळी विडोळी बु. येथील गट न.13 मधील सरस्वती ज्ञानेश्वर आवचार,महादेव आप्पासाहेब आवचार,उद्धव अप्पासाहेब अवचार,बळीराम भाऊराव अवचार,सुंदर भगवानराव, उर्मिला गोविंदराव अवचार,समाधान भगवान गोरे, सुरेश विश्वनाथ अवचार,भागवत विनायक अवचार, रामराव नानासाहेब गोरे,लक्ष्मण नानासाहेब गोरे, कैलास सदाशिव अवचार,भास्कर शंकरराव गोरे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मागील दोन-तीन दिवसापासून तालुक्यात सर्वत्र सायंकाळी सोसाट्याचा वारा व पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी आंबा, केळी, मोसंबी,संत्री, आवळा, चिंच, लिंबूनी इत्यादी प्रकारची झाडे उमळून पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी धास्तावला असून शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा करतो आहे. सर्वांधिक फटका विडोळी गावातील शेतकर्‍यांना विडोळीसह परिसरात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने शेतकर्‍यांच्या फळ बागांचे अतोनात नुकसान झाले असून संबंधित नुकसानीची पाहणी करून शासनाने शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत करावी यासाठी मंठा तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार यांनी केली आहे.

अबंड तालुक्यातील साष्टपिंपळगाव परिसरातील नालेवाडी, चदंनापुरी, भांबेरी, दह्याळा परीसरात काल 19 मे रोजी रात्री जोरदार वादळ व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसाबरोबर विज कोसळल्याने नालेवाडी येथील शेतकरी लहुराव नाना घुगे यांच्या 45 हजार रुपये किंमतीच्या गाय ठार झाली. यावेळी नालेवाडी येथे तलाठी काबंळे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. तर साष्टपिंपळगाव येथे साष्टपिंपळगाव, चुर्मापुरी रोडवर व पैठण शहागड रोडवर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. या अवकाळी पावसामुळे परिसरात नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

आंब्याच्या कैर्‍यांचा सडा, आंबा बागायतदाराचे नुकसान
जाफराबाद तालुक्यात आज दिवसभर प्रचंड उकाडा होता. त्यानंतर दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान काळेकुट्ट आभाळ दाटून येवून वारे सुटल्यानंतर पावसाच्या टपोरी थेंबाचा मारा सुरु झाल्यानंतर वादळाने तडाखा दिला. यात आंब्याचे प्रचंड नुकसान झाले असून झाडाखाली आंब्याचा सडा पडला आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. जाफराबाद तालुक्यातील खासगावसह परिसरात दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. तर येणार्‍या -जाणार्‍या वाहनधारकांनाही झाडे पडल्याने वाट शोधावी लागली. सुसाट वादळी वार्‍याने आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;