गरोदर दीपिकानेही केलं मतदान; बेबी बंपमुळे सरोगसीच्या अफवांवर पूर्णविराम

गरोदर दीपिकानेही केलं मतदान; बेबी बंपमुळे सरोगसीच्या अफवांवर पूर्णविराम

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 लोकसभा जागांसाठी मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालले. मुंबईत अनेक कलाकारांनी मतदान केले आहे. अक्षय कुमार, जान्हवी कपूर, वरुण धवन, अनिल कपूर यांसारख्या अनेक कलाकारांनी मतदान केलं. यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग दोघेही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. यावेळी दोघेही पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये ट्विनिंग करताना दिसले. इतकंच नाही तर यावेळी लोकांना अभिनेत्रीच्या बेबी बंपची झलकही दिसली. दीपिका तिचा बेबी बंप लूज शर्टमध्ये लपवताना दिसत होती. दीपिका आणि रणवीरचा व्हिडिओही समोर आला आहे. रणवीर सिंग दीपिकाला गर्दीतून बाहेर काढताना दिसत आहे. या दोघांची जोडी नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडीओमध्ये दीपिका तिचा बेबी बंप लपवताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. एका यूजरने लिहिलय की, अजून किती लपवणार, आता तुझा बेबी बंप दिसतोय. दुसऱ्या एका यूजरने लिहिलय की, दीपिका तुला खूप खूप शुभेच्छा. बाळाची काळजी घे. असे म्हणत चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

लवकरच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री तिचे शूटिंगही पूर्ण करत आहे. या चित्रपटात दीपिका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून तिची ॲक्शन स्टाइल पाहायला मिळणार आहे. तर रणवीर पुन्हा सिम्बाची भूमिका साकारणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;