मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम

मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम

मनोज जरांगे पाटील हे परळी किंवा गेवराई विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. मात्र खुद्द जरांगे यांनी याचा इन्कार केला असून आपण परळी, गेवराईच काय, राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जूनपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंगोली दौर्‍यावर असतानाच मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना थेट छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी 4 जून रोजी सुरू होणारे उपोषण कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असे सुरुवातीलाच स्पष्ट केले. कितीही एसआयटी लावा, गुन्हे दाखल करा, मी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे
मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. आमची कोणतीही मागणी नसताना सरकारने 10 टक्क्यांचे बिनकामाचे आरक्षण दिले. ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर मराठा समाज विधानसभेची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढवेल, या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

मी जातीयवाद केलेला नाही
मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही विधान मी केलेले नाही. उलट या दोन समाजातील सलोखा कायम राहावा अशीच माझी भूमिका राहिली आहे. परंतु ओबीसींचे नेते मात्र मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना नामोल्लेख न करता लगावला. मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो, मतदान झाले की मी लगेच जातीयवादी झालो, हा चमत्कारच म्हणायला हवा, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;