IPL : महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्ती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार आणि हजारो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणजे महेंद्र सिंग धोनी. याच धोनचा संघ मात्र यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे धोनी आता IPL मधून निवृत्ती घेणार का? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. मात्र आता या सर्व घडामोडींमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्ती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
42 वर्षीय धोनीच्या निवृत्ती संदर्भात समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. आयपीएल 2024 च्या संपूर्ण हंगामामध्ये धोनी दुखापतग्रस्त होता. पण तरीही तो खेळत राहिला. धोनी स्नायुंच्या दुखापतीमुळे (मसल टियर) त्रस्त आहे. अशातच धोनी आता पुढील उपचारांसाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळणार की निवृत्ती घेणार यासंदर्भात विचार करू शकतो. तसेच धोनी सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही. धोनीला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. निवृत्ती संदर्भात विचार करण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा पुरेसा वेळ त्याच्याकडे आहे. त्यामुळे या कालावधी नंतर धोनी काय निर्णय घेणार? याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List