Whatsapp आणणार नवीव फिचर, आपल्या आवडीप्रमाणे बदलता येणार चॅट बबलचा रंग
व्हॉस्टअॅपने मागील काही दिवासंमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. जसे की नवीन डार्क मोड, UI बदलल्यामुळे वापरकर्त्यांना iOS आणि Android दोन्हींवर सारखा अनुभव घेता येत आहे. व्हॉट्सअॅप आता एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे.
WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॅट्सअॅप एका नवीन फिचरवर काम करत आहे. त्यानुसार चॅट बबलच्या रंगांमध्ये बदल करता येणार आहे. आपल्या आवडी नुसार चॅट बबलचा रंग बदलता येणार असून वापरकर्त्यांना पाच रंगाचा ऑप्शन देण्यात येणार आहे. या फिचरच्या वापर केल्यानंतर वापकरकर्त्यांना पर्सनलाइज्ड अनुभव मिळणार आहे. ते चॅटसाठी व्हिज्युअल पैलू आपल्या आवडीप्रमाणे कस्टमाइज करू शकणार आहेत. या बदलामुळे वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपवर कोणतीही चॅट शोधणे सोपे जाणार आहे.
या काही बदलांसोबतच इतरही अनेक फिचर्सवर व्हॉट्सअॅप काम करत आहे. अलीकडेच व्हॉट्सअॅपमध्ये मेटा एआयचे वैशिष्ट्य देखील अॅड केले आहे. मात्र हे फिचर हिंदुस्थानातील सर्व वापरकर्त्यांसाठी अद्याप लागू झालेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List