रत्नागिरी जिल्ह्यातील 158 गावांमध्ये पाणीटंचाई
कडक उन्हाळ्याबरोबरच भीषण पाणीटंचाईने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 गावातील 158 वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. 43,960 ग्रामस्थांना 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मंडणगड तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील 158 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
दापोली तालुक्यातील 8 गावातील 12 वाड्यांमधील 4,082 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. खेड तालुक्यातील 8 गावातील 26 वाड्यांमधील 3,774 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. चिपळूण तालुक्यातील 16 गावातील 35 वाड्यांमधील 11,391 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. संगमेश्वर तालुक्यातील 15 गावातील 22 वाड्यांमधील 2,507 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
रत्नागिरी तालुक्यातील 10 गावातील 27 वाड्यांमधील 21,423 ग्रामस्थांना 5 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. लांजा तालुक्यातील 3 गावातील 5 वाड्यांमधील 625 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 61 गावातील 158 वाड्यांमधील 43,960 ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरु आहे. 4 शासकीय आणि 7 खासगी अशा एकूण 11 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List