IPL 2024 : ‘हा’ संघ ट्रॉफीवर कोरणार आपलं नाव, सुरेश रैनाचं भाकित खरं ठरणार?

IPL 2024 : ‘हा’ संघ ट्रॉफीवर कोरणार आपलं नाव, सुरेश रैनाचं भाकित खरं ठरणार?

बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारत प्लेऑफमध्ये थाटात प्रवेश केला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि बंगळुरू यांचे प्लेऑफमधले स्थान निश्चित झाले आहे. मात्र बंगळुरुच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आयपीएल 2024 ची सुरुवात बंगळुरूसाठी निराशाजनक राहीली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा झाली आणि बंगळुरुचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, असं भाकित चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनी सुद्धा केले होते. मात्र सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत बंगळुरुने सलग 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत इतिहास रचला आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने बंगळुरू संदर्भात एक भाकित केले होते. बंगळुरुने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केल्यामुळे सुरेश रैनाची भाकित खरे ठरणार असल्याच्या चर्चा सध्या समाज माध्यमांवर रंगताना दिसत आहेत.

“आरसीबीने यावेळी जिंकले पाहिजे. ते जिंकले नाहीत म्हणून मी असं म्हणत नाही. आम्ही आरसीबी सोबत जेवढे सामने खेळलो आहे. त्यावरून मी सांगू शकतो की ते ट्रॉफी जिंकण्यास पात्र आहेत,” असे सुरेश रैना म्हणाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;