छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार… शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोपाने राजकीय भूकंप

छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार… शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोपाने राजकीय भूकंप

राज्यात महायुती एकत्र लोकसभा निवडणूक लढवत आहे. परंतु काही ठिकाणी नेत्यांमधील आपआपसातील वाद समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीत खळबळ उडाली आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. दरम्यान सुहास कांदे यांचे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळले आहेत. भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते, म्हणून कांदे असे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणतात आमदार सुहास कांदे

नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष जाणूनबजून तुतारी पक्ष चालवत आहेत. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या

छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या ‘तुतारी ‘ या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल ‘ तुतारी ‘ वाजवावी असे आव्हान आ. सुहास कांदे यांनी केले. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( शिंदे गट ) मेळावा आ .कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

भुजबळांच्या निकटवर्तीयांचे फोटो व्हायरल

भुजबळांचे निकटवर्तीय असलेले विनोद शेलार भगरे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. भास्कर भगरे मतदार संघात प्रचार करीत असताना भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.

भुजबळ यांनी आरोप फेटाळले

सुहास कांदे यांच्या आरोपावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कांदे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही महायुतीचे काम करत आहोत. ही आमदारकीची निवडणूक असल्यासारखं कामे करून कमळ निशाणी निवडून आणण्याच्या सूचना दिल्यात आहेत. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्या विषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते.

भारती पवार यांना दोन कांद्याच्या त्रास नको

आधीच कांद्याच्या प्रश्नावरून लोकं प्रक्षुब्ध असताना आता या कांदेमुळे म्हणजे 2-2 कांद्याचा त्रास भारती पवारांना नको आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने भारती पवारांचे काम करू. तुमच्यामुळे भारती पवारांना मदत होण्यापेक्षा अडचणी निर्माण होत आहेत. आमच्या लोकांना कांदे बरोबर काम करणे शक्य नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरित्या करत आहे. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;