सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार; भाजपचा हिशोब चुकता करण्यासाठी जेजेपी आक्रमक

सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार; भाजपचा हिशोब चुकता करण्यासाठी जेजेपी आक्रमक

तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे अल्पमतात आलेले हरयाणातील भाजपचे नायबसिंग सैनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने शेवटचा दे धक्का द्यावा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार असल्याचे जननायक जनता पक्षाने म्हटले आहे.

चौटाला हिशेब चुकता करणार

अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतरही आपले सरकार कोणत्याही अडचणीत नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांची बहुमतासाठी कमी पडणाऱया दोन सदस्यांसाठी जेजेपीतील काही आमदारांवर कालपर्यंत मदार होती. मात्र आज जेजेपीनेच असे वक्तव्य केल्यानंतर सैनी कावरेबावरे झाले होते. याच जेजेपीला मार्चमध्ये राज्य सरकारमधून भाजपने बाहेरचा रस्ता दाखवत युती तोडली होती. आता जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला जुना हिशेब चुकता करण्यासाठी सरसावले आहेत. जेजेपी आता भाजपसोबत जाणार नाही असे सांगत, सैनी यांनी एकतर बहुमत सिद्ध करावे किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

घडामोडींना वेग

अपक्ष आमदारांपाठोपाठ जेजेपीनेही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात लोकसभेसाठी अवघ्या पंधरवडय़ाने मतदान होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले चौटाला

विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंग हुडा यांनी सैनी सरकार पाडण्यासाठी आता पावले उचलावीत, अधिक वाट पाहू नये. जर सैनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला तर आम्ही सरकारच्या विरोधात मतदान करू, असे हिसारमध्ये पत्रकारांशी बोलताना जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी सांगितले. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता सैनी सरकार अल्पमतात असताना निवडणुकीदरम्यान हे सरकार पाडले जाईल. असे पाऊल उचलले गेले तर आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा पूर्ण विचार करू असे हुडा यांना आम्ही सांगू इच्छितो, असे चौटाला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;