तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासेही खातात; काँग्रेसवर टीका करताना कंगनाचा भाजप खासदारावर निशाणा

तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासेही खातात; काँग्रेसवर टीका करताना कंगनाचा भाजप खासदारावर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया 7 मे रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रचार शिगेला पोहोचला असताना हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरलेल्या कंगना राणावत हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर टीका करताना दिसतेय.

मंडी मतदारसंघात कंगनापुढे काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान असणार असून त्यांच्याविरोधात तिने जोरदार प्रचारही सुरू केला आहे. शनिवारीही तिने एका सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मात्र काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावरही टीका केली. अर्थात बोलण्याच्या ओघात आपल्याकडून चूक झाल्याचे कंगनाच्या नंतर लक्षात आले. परंतु तोपर्यंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

काय म्हणाली कंगना?

राहुल गांधी हे विरोधी पक्षांचे शहजादे (राजकुमार) असल्याची टीका कंगनाने केली. त्यानंतर तिने तेजस्वी सूर्या हे गुंडगिरी करतात आणि मासेही खातात असे म्हणत त्यांचाही समाचार घेतला. विशेष म्हणजे तेजस्वी सूर्या हे भाजप नेते असून गेल्या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. याच तेजस्वी सूर्या यांच्यावर कंगनाने टीका केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तेजस्वी सूर्या की तेजस्वी यादव?

दरम्यान, कंपना राणावत हिला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव घ्यायचे होते. काही दिवसांपूर्वीच तेजस्वी यांनी प्रचारादरम्यान मासे खातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यांच्यावर टीका करण्याऐवजी कंगनाने तेजस्वी सूर्या यांच्यावरही निशाणा साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;