आपला रील स्टार तर फस्सी गयो, मतदान केंद्रावर रील काढली, आता पोलीस लागले मागे
Lok Sabha Election 2024 चे देशात तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून इतर टप्पे बाकी आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात राजकारण्यांचा उत्साह दांडगा आहे, तर सोशल मीडियातील रील स्टारचा उत्साह पण शिगेला पोहचला आहे. पण काही जण या उत्साहात घोडचुका करताना दिसत आहे. अशीच एक मोठी चूक रायगड जिल्ह्यातील रील स्टारने केली आहे. रील तयार करण्याचे काही भान या पठ्याला उरले नाही. त्याने थेट मतदान करतानाचे रील तयार केले. इन्साग्राम व्हिडिओचा त्यासाठी वापर केला. हा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेट्सला ठेवला. आता पोलिस त्याच्या मागावर आहे आणि रील स्टारने धूम ठोकली आहे.
कोणत्या मतदान केंद्रावरील प्रकार
रायगड जिल्ह्यात काल उत्साहात मतदान झाले. रेवदंडा येथील 12 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. त्यावेळी दुपारी एक व्यक्ती मतदानासाठी आली. तिने मतदान करतानाच रील काढली. लागलीच हा व्हिडिओ या पठ्ठ्याने विविध समाज माध्यमांवर शेअर पण केला. एका अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने पोलिसांना याविषयीची माहिती दिली.
गोंधळी याने घातला मोठा गोंधळ
- अधिकाऱ्यांनी या मतदाराचं नाव लागलीच हुडकून काढलं. प्रसाद शरद गोंधळी याने हा मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले. त्याने मतदान करताना खिशातून मोबाईल काढला. त्याच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ तयार केला. त्याची एक रील तयार केली. मतदान करतानाच त्याने हा प्रकार केला. रील तयार झाल्यावर लागलीच ती इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेट्सला ठेवला.
- मतदान प्रक्रियेत गोपनियता पाळणे आवश्यक असते. गोंधळी याने गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर पुढील प्रक्रिया सुरु आहे. एका रीलच्या चक्करमध्ये त्याने मनस्ताप मात्र करुन घेतला.
- मध्यप्रदेशात पण असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा भंग केल्याने एका भाजप नेत्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी मतदान करताना मोबाईलवरुन व्हिडिओ काढला आणि तो समाज माध्यमांवर शेअर केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List