Baramati Loksabha Voting : रोहित पवार यांचे अजित पवारांवर अत्यंत टोकाचे गंभीर आरोप

Baramati Loksabha Voting : रोहित पवार यांचे अजित पवारांवर अत्यंत टोकाचे गंभीर आरोप

“अजितदादा मित्रमंडळाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आलं. भोरला गाडी फोडण्यात आली, त्यात पैसा होता. मावळचे आमदार, नेते आणि त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते त्या गाडीत पैसे घेऊन होते. ईडी, सीबीआयने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ज्या कारखान्यांवर कारवाई केली, त्यांचे कर्मचारी फिरत होते” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय. “बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झालं. काही ठिकाणी प्रत्येक मतासाठी 2500 रुपये, काही ठिकाणी 3 हजार रुपये, काही ठिकाणी 4 हजार रुपये वाटले गेले. जात, धर्म, गरीब, श्रीमंत बघून पैसा वाटला गेला” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

“पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते. पण पैसे वाटपासाठी रात्री 1-2 वाजेपर्यंत सुरु होती. पीडीसीसी बँक, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पैसे वाटण्यासाठी वापर केला. अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे. साहेब, ताईंच्याबाजूने जनशक्ती उभी राहिल असा आम्हाला विश्वास आहे” असं रोहित पवार म्हणाले.

‘तुम्ही स्वत:च्या हिमतीवर काय केलं ?’

पैसा वाटण्याची वेळ का आली? यावर रोहित पवार म्हणाले की, “लोकांना माहितीय 2014 पर्यंत सत्ता पवार साहेबांमुळे आली. सत्ता आल्यानंतर अजित पवारांना मंत्रीपद मिळालं, मग त्यांनी विकास केला” “2019 मध्ये अजितदादांचा पराक्रम नसताना सुद्धा, साहेबांमुळे सत्ता आली. दादांना पद मिळालं, त्यानंतर त्यांनी निधी आणला. तुम्ही स्वत:च्या हिमतीवर काय केलं हे सांगता येत नाही, मग लोकं तुमच्याबाजूने कशी येणार? साहेबांना सोडलं, विचारांना सोडलं. विकास साहेबांनी केला. लोक भाविनक आहेत” असं रोहित पवार म्हणाले.

‘बारामतीमध्ये पैसा वाटला गेला’

“इंदापूर, बारामतीमध्ये पैसे वाटतायत हे लोक सांगत होते, पोलीस हसत होते. शहरी भागात खडकवासला, हवेलीत पैसा वाटला गेलाय. बारामतीत पैसा वाटला जात होता” असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. ‘पैसा, सत्तेचा अंहकार जनता मोडून काढेल’ असं रोहित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;