Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदानास सुरुवात

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदानास सुरुवात

लोकसभेच्या निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. देशातून एकूण 1,351 उमेदवार तर महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी आपले नशिब अजमवत आहेत. आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती मतदार संघात सीआरपीएफच्या 12 तुकड्या तैनात केल्या आहेत. तर राज्य पोलीस दलाचे देखील 8509 कर्मचारी देखील बारामतीत बोलवण्यात आले आहे. सकाळीच अजित पवार मातोश्रीसह मतदान करण्यासाठी दाखल झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;