अभिनेता गोविंदा प्रचारासाठी आला पण उमेदवाराचे नाव विसरला… त्याने लोकांना जिंकले पण…

अभिनेता गोविंदा प्रचारासाठी आला पण उमेदवाराचे नाव विसरला… त्याने लोकांना जिंकले पण…

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे. राजकीय नेते प्रचारसभांच्या धडका लावत आहेत. त्याचवेळी राजकीय पक्षांशी संबंधित सेलिब्रेटीज प्रचार सभा अन् रोड शो करत आहेत. बॉलीवूड अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच दाखल झाला. तो आता महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार अन् रोड शो करत आहे. मावळ लोकसभा मतदार संघात गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होतो. त्यावेळी तो आला, त्याने पाहिले अन त्याने जिंकलं ही…असे झाले. पण तो कोणाच्या प्रचारासाठी आला हेच विसरला. अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना त्यांना श्रीरंग बारणे यांचे नाव सांगावे लागले.

नाव घेताना अडखळला मग…

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभेत आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या रोड शो साठी तो आला, ते उमेदवार श्रीरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते. गोविंदा यांना त्यांचे नाव आठवत नव्हते. यामुळे अखेर भाजपच्या आमदार उमा खापरे यांना कानात त्यांचे नाव सांगावे लागले.

हे दृश्य कॅमेरात कैद

गोविंदा यांना आमदार उमा खापरे कानात उमेदवाराचे नाव सांगत असतानाचे दृश्य माध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता उमेदवाराचे नाव लक्षात नसेल तर गोविंदाला बोलावून काय साध्य झालं? असा प्रश्न गोविंदाच्या उजव्या बाजूला बसलेल्या बारणे यांना नक्कीच पडला असेल. त्यांच्या चेहऱ्यावर तसाच काहीसा प्रश्न निर्माण झाल्याचं ही दिसून येत होतं.

गोविंदा अन् श्रीरंग बारणे

आता रंगली चर्चा

श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे नावचं गोविंदाला माहीत नसल्याचे समोर आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा चांगली रंगली आहे.

मावळमध्ये १३ मे रोजी मतदान

मावळ लोकसभेचं चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मावळात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू असून मावळच्या आखाड्यात कोणता उमेदवार बाजी मारेल हे ४ जूनला समजणार आहे. परंतु काळ्या मातीतील पैलवानांनी महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे यांना पाठिंबा दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;