भरसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ते पाप माझ्याकडून झालं; असं का म्हणाले ठाकरे?

भरसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ते पाप माझ्याकडून झालं; असं का म्हणाले ठाकरे?

नरेंद्र मोदी यांचं नाव 2014 मध्ये पंतप्रधानपदासाठी ठरवण्यात आलं. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मला फोन केला. माझं मत जाणून घेतलं. त्यावेळी मी मोदींच्या बाजूने मत दिलं. पण ते पाप माझ्याकडून झालं आहे, अशी जाहीर कबुली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ऐरोली येथील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही कबुली दिली आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणाही साधला.

मोदीजी तुम्ही लाखतीत बोलला, उद्धवजींबद्दल प्रेम आहे. मी काही ती मुलाखत पाहिली नाही. पण तुम्ही विसरला असाल 2014 साली पंतप्रधानपदासाठी तुमचं नाव भाजपने ठरवलं. तेव्हा अध्यक्ष होते राजनाथ सिंह. तेव्हा राजनाथ सिंह यांनी मला विचारलं आपकी राय क्या है? मी तुमच्या बाजूने मत दिलं. पण ते पाप माझ्याकडून झालं. तेव्हा तुम्हाला शिवसेना चालत होती. 2014मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होता, 2019मध्येही उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते. आजही आहे. अन् तरीही माझ्या शिवसेनेला नकली म्हणता. मग आमचा पाठिंबा घेतला कसा?, असा सवालच उद्धव ठाकरे यांनी केला.

आमचं नाणं खणखणीत

आमचं नाणं खणखणीत आहे. मोदींसारखं तकलादू नाही. मोदींचं नाणं चालत नाही. म्हणून माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागत आहे. मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवतोय. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वडिलांचे फोटो लावून निवडणूक लढवावी. राजकारणातील बाप मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा. माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. ही मर्दांची शिवसेना आहे. आज तुम्ही संभ्रम निर्माण केला आहे. माझ्या लोकांमध्ये संभ्रम नाही. पण भाजपच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, उद्धव ठाकरेंचं करायचं काय?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तर भारतात जल्लोष होईल

मोदीजी तुमचा पराभव झाला तर अख्ख्या भारतात जल्लोष केला जाणार आहे. पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. केक कुणी खाल्ला. बिन बुलाया मेहमान वापस आनेवाला है. केक तयार रखो… असा टोलाही त्यांनी लगावला.

तर सरकार महाराष्ट्रातच गाडलं जाईल

तुमची खुर्ची, पंतप्रधानपद महाराष्ट्रातील जनता खेचल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राने कमळाबाईला एकही जागा द्यायचं नाही असं ठरवलं तर महाराष्ट्रातच हे सरकार गाडल्या जाईल. राज्याने 40-42 जागा दिल्याने मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसले, असंही ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;