अजितदादांचं ‘ते’ वाक्य काळजाला लागलं… सुप्रिया सुळे जाहीर सभेत म्हणाल्या, तो निर्णय पांडुरंगाचा…

अजितदादांचं ‘ते’ वाक्य काळजाला लागलं… सुप्रिया सुळे जाहीर सभेत म्हणाल्या, तो निर्णय पांडुरंगाचा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका खासदार सुप्रिया सुळे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते एक वाक्य बोलले होते. समोरचे येतील, भावूक होतील. म्हणतील, त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं हे इलेक्शन पहिलं दुसरं की शेवटचं हा निर्णय तुमचा नसेल. तर माझ्या पांडुरंगाचा असेल. तुमच्या या बुरसटलेल्या विचाराच्या आम्ही नांदी लागणार नाही, असं हल्लाच सुप्रिया सुळे यांनी चढवला.

बारामती येथील जाहीर सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार दिवसातून तीन चार सभा करतात. एवढी एनर्जी येते कुठून? असं मला लोक विचारतात. मी त्यांना सांगते, त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आहे आणि त्यांची एनर्जी मायबाप जनता आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना साथ द्याल, तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे येऊ द्या सर्व. बोलू द्या सर्व
काही. काही लोक आता व्हिडीओ दाखवत आहेत. आम्ही पवार साहेबांना संपवणार असं म्हणत आहेत. जोपर्यंत तुम्ही पवारांची ढाल आहात. तोपर्यंत कोणी मायका लाल त्यांना संपवू शकत नाही, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला.

बक्षीस मिळतं त्यावरही टीका करतात

संपूर्ण देशात वाराणासीपेक्षा बारामतीची निवडणूक महत्त्वाची वाटतं असेलं तर हीच खरी बारामतीची ताकद आहे. यातच आपला विजय आहे. मला बक्षीस मिळतं त्यावरही टीका झाली. मला संसदरत्न मिळाला. संसदरत्न देताना भाजपचे संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल हे मार्क देतात. तेव्हा आम्हाला हा पुरस्कार मिळतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात

मला सर्व काही माहीत आहे. मलाच सर्व काही माहीत आहे. काही गोष्टी अश्या असतात, त्या पोटातचं ठेवायच्या असतात. माझं पोट मोठं आहे. कारण नाती तोडायला नाही तर जोडायला कष्ट लागतात. माझ्या आजींनी जोडून ठेवलेली नाती दिल्लीतले सुई घेऊन तोडायचा प्रयत्न करत आहेत, असा दावा करतानाच माझं चिन्ह बदललं आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता माझं चिन्ह तुतारी आहे. हे लक्षात ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.

एक रुपयाचा कढीपत्ता

आपल्या विचारचं सरकार केंद्रात असेल तर विकास होतो असं म्हणता तर, सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तिथं पाण्याचा प्रश्न सुटला का? बाकीचे प्रश्न सुटले का? या दोन जिल्ह्याचा काय विकास झाला? सोलापूरमध्ये तर एक रुपयांचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता असं म्हटलं जातं, अशी टीकाही त्यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;