…तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा; रावसाहेब दानवे यांची तुफान बॅटिंग

…तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा; रावसाहेब दानवे यांची तुफान बॅटिंग

लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. काही जण जहरी टीका करत आहेत. तर काही त्यांच्या खुमासदार भाषणांनी सभेत हश्या पिकवत आहेत. काही नेते एकमेकांना चिमटे काढत आहेत. लोकसभेच्या धामधुमीत शेरो-शायरी, कवितांचा पण पूर आला आहे. अनेक नेते किस्से सांगून मतदारांना खिळवून ठेवत आहेत. आपल्या खुमासदार शैलीसाठी भाजप नेते रावसाहेब दानवे ओळखले जातात. त्यांनी जालन्यात केलेल्या भाषणामुळे प्रचाराला चांगलीच रंगत आली. त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळे यावेळी एकच हश्या पिकाला.
जालना

तर लालू हेल्यावर आलेच म्हणून समजा

त्यांनी इंडिया आघाडी-महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. चेहरा नसलेली आघाडी मते मागत आहे, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. ममता दीदी म्हणाली मी पंतप्रधान, तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा, असा चिमटा त्यांनी काढला. आघाडीचे सरकार चालत नाही. कुण्या एकाचे सरकार पाहिजे असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला.

कल्याण काळे यांच्यावर टीका

ज्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, पंतप्रधान पदाचा चेहरा नाही असे लोक मते मागतात, अशी टीका त्यांनी प्रतिस्पर्धी कल्याण काळे यांच्यावर केली. कल्याण काळे यांनी रस्ते विकासावर बोलावे. मी सहा हजार कोटी रस्त्यासाठी आणले, तुम्ही श्रीमंतीवर बोलू नका केंद्राने विविध योजनांसाठी निधी दिला. काँग्रेसने विकासावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. मी खोटा ठरलो तर उठ बशा काढेल, असे ते म्हणाले.

मी सासू तर या सुना

मी जालन्याचा तर जालना माझे आहे. मी एका छोट्या गावाचा माणूस आहे. मी सरपंच असताना गावात लाईट आणली. मी चांगले काम केले म्हणून लोकांनी मला सभापती, आमदार, खासदार, मंत्री केले. पैसे आणणे माझे काम आहे, मी सासू आहे आणि अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत, असे सांगत त्यांनी एकच हश्या पिकवला. पुढच्या वेळेस मी आमदार होतो आणि अर्जुन राव यांना खासदार करतो. अर्जुन खोतकर माझी सून असले तरी जनता बाप आणि आजोबा आहे. मी केंद्रात बसलो याचे श्रेय जनतेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांची जंत्रीच वाचून दाखवली. त्यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;