घटनेला हात लावला तर अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

घटनेला हात लावला तर अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

uddhav thackeray Live : उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकारचा घटना बदलण्याचा मनसुबा असल्याचं ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, तुम्ही घटनेला हात लावून पाहा. ज्या दिवशी घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही. देशातील लोकं काय गुरंढोरं आहेत का? एकदा मूर्ख बनवाल. काही जणांना सदैव मूर्ख बनवाल. पण सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. कारण जनता आता जागी झाली आहे. प्रत्येकवेळी निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लीम दंगे लावले जात आहेत. आता त्यांनी नवीन काढलं. मी बातम्या वाचतो आणि बघतो. इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल म्हणून सांगतात. अरे आमच्यापैकी कोणी तरी न बोलावता नवाज शरीफचा केक खाऊन आला का. आमच्यापैकी कोणी तरी जीनाच्या कबरीवर जाऊन आला का. आपल्यात भांडणं लावायचा हा प्रकार आहे.

सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. जाऊन दाखव. मी कोकणात गेलो. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील. अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना आहे. मग मी त्यांना काय बोललो… काल जे बोललो ते सांगतो. जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहे. हे माझे वैभव आहे. ही माझी संपत्ती आहे. बी बियाणे आणि अवजारांवरील जीएसटी माफ करेल. सरकार आल्यावर.

अमित शाह तुमच्या लाज असेल हिंमत तर नाही. तर जनतेच्या प्रश्नावर बोला. धाराशीवला कधी देणार पाणी. मोदीजी तुम्ही तुमच्या दहा वर्षातील कामे जनतेसमोर ठेवा. मी अडीच वर्षातील कामे ठेवतो. तुम्ही जिंकला तर मी घरी बसणार. ईडी कारवाया करून ज्यांनी आमच्या लोकांना सतावलं. त्याचा हिशोब व्याजासह परत केल्याशिवाय राहणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;