समुद्रात उसळणार उंच लाटा, हवामान विभागाकडून 36 तासांचा अलर्ट

समुद्रात उसळणार उंच लाटा, हवामान विभागाकडून 36 तासांचा अलर्ट

मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. या लाटा 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंच असणार आहे. यामुळे 4 मे पासून रात्री 2.30 वाजेपासून 5 मेपर्यंत रात्री 11.30 वाजेपर्यंत अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तब्बल 36 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवा

समुद्रात ज्या प्रकारे लाटा उठण्याचा अंदाज वर्तवला जातो त्याला कलक्कडल म्हणतात. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ने (INCOIS) एक इशारा दिला आहे. INCOIS देशभरातील मच्छिमारांना अलर्ट जारी करते. INCOIS ने केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमधील मच्छिमारांना त्यांच्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे.

मुंबईत दोन दिवस ऊकाड्याचे

मुंबईत दोन दिवस ऊकाड्याचे असणार आहे. शनिवार रविवार तापमान वाढणार आहे. मुंबईच्या हवेत शनिवार आणि रविवार आर्द्रता अधिक प्रमाणात असेल. त्यामुळे उकाड्याची झळ बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई तसेच उपनगरात शनिवार, रविवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान असणार आहे.

या ठिकाणी यलो अलर्ट

किनारपट्टीसह सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबादला शनिवार, रविवारसाठी “यलो अटॅलर्ट’ देण्यात आला आहे. किनारपट्टीवर उष्णतेसह दमट वातावरण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाटसद्दश स्थितीचा अंदाज आहे.

मॉन्सून दरम्यान 22 वेळा हाईटाइड

यंदा मॉन्सून दरम्यान 22 वेळा हाईटाइड येण्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान हायटाईडचा धोका मुंबईतील समुद्रात असणार आहे. यामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचणार आहे. पावसासोबत हायटाईड आल्यानंतर हा धोका निर्माण होतो.

हे ही वाचा…

मुंबईकरांसाठी सावधानीचा इशारा, यंदा मॉन्सूनमध्ये 22 वेळा हाईटाइड

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;