कल्याण लोकसभा मतदार संघात ट्विस्ट कायम, शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडाळी

कल्याण लोकसभा मतदार संघात ट्विस्ट कायम, शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडाळी

कल्याण लोकसभा मतदार संघात मोठी घडामोडी घडली आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर झाले होते. त्या महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणार होत्या. त्याचवेळी कल्याणमधून शिवसेना ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर रमेश जाधव यांच्याकडून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ठाकरे गट 6 मे रोजी एबी फॉर्म बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरोधातील उमेदवार ठाकरे गट बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

उद्धव सेनेचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार कल्याणचा उमेदवार कोणाला करणार याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून दोन उमेदवारी अर्ज आल्यामुळे कल्याणची रणनीती ठाकरे गट बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांची ठाकरे गटावर टीका

कल्याणमध्ये दुसरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीला ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे. एका उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यानंतर त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो. त्याला एबी फॉर्म दिला जातो. यावरून त्यांच्या पक्षांमध्ये असलेली गोंधळाची परिस्थिती समोर आली आहे. त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही, आमच्याकडे जिंकण्याचा विश्वास आहे. श्रीकांत शिंदे यांनी गेली दहा वर्षे कल्याण लोकसभेत केलेले जे काम आहे ते लोकांसमोर आहे.

खरी शिवसेना ही मोदींबरोबर

खरी शिवसेना ही मोदींबरोबर आहे. हे पंतप्रधान मोदी खरं म्हणाले. कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत. धनुष्यबाण आमच्याबरोबर आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, ती खरी शिवसेना होऊच शकत नाही. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार नको. त्यांना धनुष्यबाण नको आहे. त्यांना फक्त आणि फक्त पैसे पाहिजे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या खात्यातले जनतेचे पैसे म्हणजे शिवसेनेचे 50 कोटी देखील काढून घेतले आहे.

हे ही वाचा

पाच वर्षांत श्रीकांत शिंदे यांच्या मालमत्तेत १३ कोटींनी वाढ

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;