Maharashtra Political News live : अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांचा अजित पवार गटात प्रवेश
बारामती लोकसभा मतदारसंघात आज सभांचा धडाका. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात आज मोठं शक्ती प्रदर्शन. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा, तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीकडून दौंड मधल्या वरवंड येथे सभेचं आयोजन. शरद पवार यांच्या उपस्थितीत वरवंड येथे पार पडणार महाविकास आघाडीची जाहीर सभा. बाळासाहेब थोरात ,आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, भूषण सिंहराजे होळकर महाविकास आघाडीच्या सभेसाठी लावणार हजेरी. पुणे शहरात आंब्यांची आवक वाढली. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये दिवसाला आठ ते दहा हजार पेटी आंब्यांची आवक. पुढील आठवड्यात अक्षय तृतीया असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता. आंब्याच्या भावामध्ये वाढ तरी देखील मागणी तितकीच. पुणे शहरात आंब्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List