अखेर संजय निरुपम यांच्या हाती शिवबंधन! 19 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी

अखेर संजय निरुपम यांच्या हाती शिवबंधन! 19 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी

काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम यांनी आज अखेर शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज पार पडला. संजय निरुपम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. संजय निरुपम हे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण ठाकरे गटाने या ठिकाणी अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संजय निरुपम संतापले आणि त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. परिणामी, काँग्रेसने आघाडी धर्माचं पालन न केल्याने पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तब्बल 6 वर्षांसाठी निलंबित केलं.

काँग्रेसच्या कारवाईनंतर संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती जारी केली होती. संजय निरुपम यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर संजय निरुपम यांचा आज शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मी संजय निरुपम यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्तादेखील आता शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय निरुपम यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं होतं. संजय निरुपम यावेळी लोकसभा निवडणूक लढवू इच्छुक होते. ते पक्षात सहभागी झाले आहेत. पण त्यांना त्यामोबदल्यात काहीच मिळालं नाही. हे माहिती असूनही त्यांनी ते शिवसेनेचं काम करण्यासाठी पक्षात सहभागी झाले. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तब्बल 19 वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश

संजय निरुपम यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना पासूनच आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून पक्षशिस्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित करण्यात आलं. यानंतर आज संजय विरुपम यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय निरुपम यांनी याआधी शिवसेनेचं हिंदी मुखपत्र ‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राचे संपादक देखील होते.

संजय निरुपम यांनी 2005 मध्ये शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी 2009 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यांनी गेल्या 19 वर्षात काँग्रेस पक्षात अनेक पदांवर काम केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;