ठाकरे की शिंदे, मुंबईत आवाज कुणाचा? काय आहे पक्षीय बलाबल?
मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांचा मोहोल सुरु आहे. केंद्रात सलग दोन वेळा सत्ता मिळविणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीए आघाडीने ‘अब की बार, 400 पार’चा नारा देत पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्याचा निर्धार केलाय. एनडीए आघाडीने प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. देशातील विविध राज्यात लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे तर पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदार संघ आहेत. येथे शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि पक्ष बळकावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार टक्कर होणार आहे. या मतदार संघातील काय आहे परिस्थिती याचा घेतलेला आढावा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List