समान नागरी कायदा का लागू केला पाहिजे?; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

समान नागरी कायदा का लागू केला पाहिजे?; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. समान नागरी कायदा लागू व्हावा ही संविधानाची भावना आहे. संविधानातच तसं लिहिलं आहे. पण अजूनही हा कायदा लागू करण्यात आला नाही. त्यामुळे ज्यांनी हा कायदा लागू केला नाही. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. देश चालवायचा आहे तर देशात समान नागरी कायदा असावा की नसावा? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला महामुलाखत दिली. टीव्ही9 नेटवर्कच्या पाच संपादकांशी मनमोकळा संवाद साधताना पंतप्रधानांनी देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांना समान नागरी कायद्याबाबतचा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत समान नागरी कायदा का हवा? याचं विवेचन केलं. समान नागरी कायदा लागू कधी करणार? हा सवाल मीडिया आम्हाला विचारत आहे. मला आश्चर्य वाटतं. मीडियाने हा सवाल 75 वर्षानंतर का विचारला? त्या आधी का विचारला नाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक सरकारला आणि पंतप्रधानांना हा सवाल विचारायला हवा होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

गोव्यात अडचण नाही, मग देशात कशी होईल?

सर्वोच्च न्यायालयाने 2500 वेळा गाजावाजा करून सांगितलं की सरकारने यूसीसीवर (समान नागरी कायदा) पावलं उचलली पाहिजे. म्हणून तुम्ही काँग्रेसकडेच याबाबतचं उत्तर मागितलं पाहिजे. यूसीसीविरोधात आवाज उठवणाऱ्यांना मी सांगतो, जरा गोव्याकडे पाहा. देश स्वातंत्र झाला तेव्हापासून तिथे यूसीसी आहे. गोव्यात सर्वाधिक मायनॉरिटी आहेत. तरीही गोव्यात काहीच समस्या नाही. सुखासमाधानाने सर्व राहत आहेत. गोवा वेगाने विकास करत आहे. त्यामुळे सर्व राज्यांना आज वाटत की, जर समान नागरी कायद्यामुळे गोव्यात सुख समाधान आहेत तर आपल्या राज्यात का नाही? त्यामुळेच समान नागरी कायदा आणण्यासाटी आम्ही वचबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

म्हणून जनतेचे आशीर्वाद मागत आहोत

सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करणार हे आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये सांगत आलो आहोत. आता त्यावर कशा पद्धतीने पुढे जायचं, कसा मार्ग काढायचा हे आपण परिस्थितीनुसार करत असतो. जसं देशाच्या एकतेसाठी संविधान जिथं नव्हतं तिथं आपण पोहोचवलं, तशीच आमची कमिटमेंट आहे. ही कमिटमेंट आमची पॉलिटिकल आयडॉलॉजी नाही. तर संविधानातील भावनेचाच भाग आहे. संविधानातील भावना यूसीसीबद्दल बोलत आहे. देशातील सुप्रीम कोर्ट यूसीसीबद्दल बोलत आहे. देशातील संवैधानिक संस्थांनी जे सांगितलं, ते करण्याचे आम्ही मार्ग शोधत आहोत. त्यामुळे आम्ही जनतेचे आशीर्वाद मागत आहोत, असं मोदी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;