PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रीच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महाराष्ट्राचं राजकारणाबाबत नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. “महाराष्ट्रात विरोधी पक्षाबाबत संभ्रम आहे. शिवसेना फुटली आहे, राष्ट्रवादी फुटली आहे, काँग्रेसचे काही नेते इकडे तिकडे गेले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भावनिक मुद्दा आहे. भाजपसमोर महाराष्ट्रात भावनिक मुद्दा मोठं आव्हान आहे असं वाटतंय का?”, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या आपल्या भावनिक नात्याबाबत माहिती दिली.

‘उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी…’

“दोन गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल”, अशी भावनिक प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

‘मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही’

“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

उद्धव ठाकरेही म्हणाले होते, ‘मोदी माझे शत्रू नाहीत’

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषणात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता टीव्ही 9 च्या मुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;