PM Modi On Election : 2024ची निवडणूक शेवटची?, देशात निवडणुका होतील की नाही?; मोदींनी बेधडक काय सांगितलं?

PM Modi On Election : 2024ची निवडणूक शेवटची?, देशात निवडणुका होतील की नाही?; मोदींनी बेधडक काय सांगितलं?

देशात लवकरच हुकुमशाही येणार असल्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. देशातील लोकशाही भाजपमुळे धोक्यात आल्याचा आरोप विरोधी खेम्यातून वारंवार करण्यात येत आहे. संविधान पण बदलण्याचा डावा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या दाव्यातील अशी हवा काढली.

 हुकूमशाह कधीच जन्माला येणार नाही

२०१४मध्येही असंच म्हटलं गेलंय. ही निवडणूक शेवटची आहे. २०१९मध्येही म्हटलंय की ही निवडणूक शेवटची आहे. आता २०२४मध्येही तेच म्हणत आहेत. याचा अर्थ विरोधकांची बँकरप्सी आहे. त्यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नाही. जी गोष्ट होणार नाही. होणार नाही, संभावना नाही, त्यावर काय बोलायचं. या देशात एवढा मोठं संविधान आहे, देशात ९०० टीव्ही चॅनल्स चालतात तिथे हुकूमशाह जन्मालाच येऊ शकत नाही. ढगातून येऊनही निर्माण होऊ शकत नाही. ज्या देशात न्यायालय एवढं व्हायब्रंट आहे, तिथे हुकूमशाह कधीच निर्माण होऊ शकत नाही. तो जमाना गेला. १९७५मध्ये देशाने एक संकट झेललं. पुन्हा ते संकट येणार नाही, असा खरपूस समाचार मोदींनी घेतला.

खरंच संविधान बदलणार का?

पहिली गोष्ट म्हणजे, आज आपल्याकडे किती जागा आहे. आजही एनडीएकडे सुमारे ३६० जागा आहेत, आणि एनडीएच्या व्यतिरिक्त म्हणजे बीजेडी एनडीएत नाही. पण त्यांच्या जागाही गृहित धरल्यास आम्ही ४००च्या पुढे आहोत. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही, असे मोदी म्हणाले.

नेहरुंवर पुन्हा टीका

पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा.  जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम या कुटुंबाने केलं आहे. त्यांनी संविधानाच्या मर्यादा तोडल्या. काँग्रेसने अधिकृतरित्या संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. गेनचा खेळ आहे. त्यांनी संविधानासोबत नेहमी छेडछाड केली. नेहरू, एवढे मोठे लोकशाहीचे चेहरा म्हणता ना… संसदेत त्यांनी सर्वात आधी संविधानात दुरुस्ती केली ती फ्रिडम ऑफ स्पीचवर रिस्ट्रिक्शन आणणारं. पूर्णपण अलोकशाहीवादी नेहरूंनी केलं होतं, अशी टीका मोदींनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;