मुंबईकरांसाठी सावधानीचा इशारा, यंदा मॉन्सूनमध्ये 22 वेळा हाईटाइड, कधी अन् किती धोकादायक…

मुंबईकरांसाठी सावधानीचा इशारा, यंदा मॉन्सूनमध्ये 22 वेळा हाईटाइड, कधी अन् किती धोकादायक…

भारतीय समुद्रात मॉन्सून पूर्व आणि मॉन्सून दरम्यान अनेक वेळा भरती येत असते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ही भरती येत असते. यंदा मॉन्सून पूर्व म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान भरतीचा मोठा धोका नाही. परंतु मॉन्सून दरम्यान यंदा जोरदार भरती येणार आहे. यामुळे यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबईकरांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात यंदा 4.84 मीटरपेक्षा जास्त हायटाईड (भरती) 22 वेळा येण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान हे हायटाईड येणार आहे. यामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचणार आहे. पावसासोबत हायटाईड आल्यानंतर हा धोका निर्माण होतो.

 

कधी कशी येणार हायटाईड

जूनमध्ये सात दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती असेल. जुलैमध्ये असे चार दिवस, ऑगस्टमध्ये पाच दिवस आणि सप्टेंबरमध्ये सहा दिवस अशी भरती असणार आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 1:03 वाजता उंच भरती 4.84 मीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

जूनमध्ये असे येणार हाईटाइड

5 जून- 11: 17 वाजता – 4.61 मीटर
6 जून -12 : 05 वाजता – 4. 69 मीटर
7 जून – 12 : 50 वाजता – 4 . 67 मीटर
8 जून – 01 : 34 वाजता – 4. 58 मीटर
23 जून – 01: 09 वाजता – 4. 51 मीटर
24 जून- 01: 53 वाजता- 4. 54 मीटर

जुलैमध्ये असे येणार हाईटाइड

22 जुलै – दुपारी 12:50 वाजता – 4.59 मीटर
23 जुलै- दुपारपी 1:29 वाजता – 4.69 मीटर
24 जुलै – दुपारी 02:11वाजता – 4.72 मी
25 जुलै – दुपारी 02:51 वाजता- 4.64 मीटर

ऑगस्टमध्ये असे येणार हाईटाइड

19 ऑगस्ट – सकाळी 11:45 वाजता – 4.51 मीटर
20 ऑगस्ट – दुपारी 12:22वाजता – 4.70 मी
21 ऑगस्ट- दुपारी 12:57 वाजता- 4.81 मीटर
22 ऑगस्ट- दुपारी 1:35 वाजता 4.80 मीटर
23 ऑगस्ट- दुपारी 2:15 वाजता 4.65 मीटर

सप्टेंबरमध्ये असे येणार हाईटाइड

17 सप्टेंबर – सकाळी 11:14 वाजता – 4.54 मीटर
18 सप्टेंबर – सकाळी 11:50 वाजता – 4.72 मीटर
19 सप्टेंबर – दुपारी 12:19 वाजता 4.69 मीटर
20 सप्टेंबर – दुपारी 1:03 वाजता 4.84 मीटर
21 सप्टेंबर – दुपारी 1:42 वाजता 4.50 मीटर
22 सप्टेंबर – दुपारी 2.33 वाजता 4.64 मीटर

मागील वर्षी असे होते वादळ

गेल्या वर्षी ‘बिपरजॉय’ वादळ जूनमध्ये अरबी समुद्रात आले होते. 16 जून 2023 रोजी गुजरातच्या किनारपट्टीला हे वादळ पूर्ण ताकदीने धडकले होते. मागील वर्षी 2023 मध्ये बंगालच्या उपसागरावर ‘मोचा’ हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ आले होते. प्रदीर्घ सागरी प्रवासानंतर, वादळ म्यानमारच्या दिशेने सरकले आणि 14 मे 2023 रोजी सिटवे जवळील किनारपट्टी ओलांडले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;