मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींचे आरोपात वास्तव काय?

मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींचे आरोपात वास्तव काय?

Loksabha election : पंतप्रधान मोदींकडून सध्या मुस्लीम आरक्षण आणि मंगळसूत्रावरुन काँग्रेसवर गंभीर आरोप होत आहेत. एससी, एसटींचं आरक्षण काँग्रेस मुस्लिमांना देणार तसंच मंगळसूत्रही काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना देईल असं मोदी प्रत्येक सभेतून सांगत आहेत. मात्र खरंच काँग्रेसच्या जाहीरमनाम्यात असं काही आहे का ? काय तथ्य आहे. 2 दिवसांत मोदींनी महाराष्ट्रात तब्बल 6 सभा घेतल्या. सोलापूर, कराड, पुणे, माळशिरस, धाराशीव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभेतून 2 मुद्दे कायम राहिले. एसटी एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कमी करुन, काँग्रेस मुस्लिमांना देणार आणि संपत्ती, सोनं मंगळसूत्र काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना वाटणार असा आरोप त्यांनी केला आहे.

मोदी प्रत्येक सभेत या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत आणि त्यासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचाच दाखल देत आहेत. आता खरंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं काही आहे का ? तेही पाहणार आहोत.

मुस्लिमांच्या आरक्षणावरुन काँग्रेसच्या घोषणात्रात असं काही आहे का?

काँग्रेस अल्पसंख्यांना मिळणाऱ्या मुलभूत अधिकारांचा आदर करेल, आणि त्या अधिकारांना कायम ठेवणार. अल्पसंख्याक वर्गातील मुलं, मुलींना शिक्षण, रोजगार. खेळ आणि इतर क्षेत्रात फायदा घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आणि मदत करणार. एससी एसटींचं आरक्षण काढून मुस्लिमांना आरक्षण देणार, असं घोषणापत्रात काहीही नाही.

मोदींच्या भाषणातील दुसरा कॉमन मुद्दा आहे, सोनं आणि संपत्तीचा. काँग्रेसची नजर संपत्ती आणि सोनं मंगळसूत्रावर असून काँग्रेस अधिकची संपत्ती हिसकावून घेणार आणि मंगळसूत्र आपल्या व्होट बँकेला वाटून देणार असं मोदी म्हणत आहेत.

काँग्रेसच्या घोषणापत्रात संपत्तीवरुन काय लिहिलंय, ते पाहा…

काँग्रेस आर्थिक-सामाजिक स्तरावर जातीय जनगणना करणार. जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस आर्थिक, सामाजिक स्थिती माहिती करेल. आणि आकडेवारीनुसार काँग्रेस त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलणार. 2014 ते 2023 या कालावधीत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील असमानतेत वाढ झाली आहे. काँग्रेस ही असमानता दूर करणार. म्हणजेच इथंही एकाची संपत्ती किंवा सोनं दुसऱ्याला वाटणार असं काहीही नाही.

संपत्ती आणि मुस्लीम आरक्षणावरुन मोदी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर तुटून पडत आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मोदींवर घटना बदलण्याच्या इराद्यावरुन निशाणा साधत आहेत.

भाजपकडून चारसौ पारची घोषणा देत पहिल्या टप्प्यात विकासावरुन जोरदार प्रचार झाला. काँग्रेसचा जाहीरनामा आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यापासून प्रचाराची लाईन बदललीय. प्रचारात हिंदू मुसलमान, संपत्ती आणि मंगळसूत्राची एंट्री झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;