नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार : महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार तापला

नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार : महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार तापला

महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार सध्या मोदी विरुद्ध शरद पवार असा झाला आहे. 2 दिवसांत मोदींनी महाराष्ट्रात 6 सभा घेतल्या आहेत. आणि या सभेतून मोदींच्या निशाण्यावर शरद पवारच अधिक वेळ आले. मोदींनी भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार आणखी तापला आहे. महाराष्ट्राच्या प्रचारात मोदींच्या एका वक्तव्यानं राजकारण चांगलंच तापलंय. अर्थात मोदींनी पुण्याच्या सभेतून भटकती आत्मा शरद पवारांनाच म्हटलं इच्छा पूर्ण न झालेली भटकती आत्मा इतरांचाही खेळ बिघडवते. पुलोदच्या सरकारचा दाखला देत मोदींनी पवारांवर अस्थिरतेचा खेळ सुरु केल्याचा आरोप केला.

मोदींच्या टीकेला पवारांचं उत्तर

मोदींच्या या टीकेला खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. लोकांचं दु:ख बघून माझा आत्मा तडफडतो. पण मी लाचार नाही. कोणाचे पक्ष फोडले नाही, घरातली माणसं फोडली नाहीत असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे. आता मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेही तुटून पडले आहेत. मोदींचा गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, अशी टीका राऊतांनी केली. उद्धव ठाकरे यांनी देखील पीएम मोदींवर टीका केली आहे. महाराष्ट्र गद्दार नाहीये. भाजप सर्व चोरांना घेत आहे. औरंगजेबचा आत्मा अजूनही इथे भटकत असेल. असं ही त्यांनी म्हटलंय.

भटकती आत्म्याच्या टीकेला शरद पवारांनीच सभेतूनच उत्तर दिलं तर ही भटकती आत्मा नेमकी कोण हे मोदींनाच विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पुण्यातल्या सभेनंतर, माढ्यातूनही मोदींनी शरद पवारांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं. रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींनी माढ्यात सभा घेतली. 2009 मधून स्वत: शरद पवारांना माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढत खासदार झाले. पण बुडत्या सूर्याची शपथ घेणाऱ्या शरद पवारांनी माढ्यात पाणी आणलं का ? म्हणून आता शरद पवारांची माढ्यातून लढण्याची हिंमत नाही, असा हल्लाबोल मोदींना केलाय.

माढ्यात काट्याची टक्कर

माढ्यात भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काट्याची टक्कर आहे. भाजपच्या रणजित सिंह निंबाळकरांविरोधात भाजपातून पवार गटात आलेल्या धैर्यशील मोहितेंमध्ये थेट लढत आहे. आणि माढ्याच्या जागा किती प्रतिष्ठेची झाली हे मोदींच्या सभेवरुन स्पष्ट दिसतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;