‘कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान’; पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर ओवेसींचा पलटवार

‘कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान’; पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर ओवेसींचा पलटवार

Lok Sabha Election 2024 : राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रचार केला. जर काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संपत्ती त्या लोकांमध्ये वाटण्यात येईल, ज्यांची अधिक मुलं आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरुन देशभरात एकच काहूर उठले. विरोधकांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पण पंतप्रधानावर निशाणा साधला आहे.

कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान

हैदराबाद येथील एका निवडणूक प्रचारसभेत ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींनी काही दिवसांपूर्वी देशातील मुसलमान हे घुसखोर असल्याचा दावा केल्याचे ओवेसी यांनी सांगितले. घुसखोर तो असतो जो विना परवानगी एखाद्या देशात घुसतो. आमचा धर्म नक्कीच वेगळा आहे. पण आम्ही तर याच देशाचे रहिवासी आहोत. हा देश आमचा आहे. पंतप्रधान म्हणतात मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात. पण खरं तर मुसलमानांचा प्रजजन दर घसरला आहे. इतकंच नाही तर भारतात मुस्लीम पुरुष सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. हे मी नाही, तर सरकारचा रिपोर्ट सागंतो, असा निशाणा ओवेसी यांनी साधला.

हिंदूंना घाबरविण्यासाठी अशा गोष्टी

हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी भाजप आणि RSS ची माणसं अशा गोष्टी करतात, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्यांचे काम हे द्वेष वाढवणे आहे. हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे की, देशातील मुसलमान बहुसंख्याक होतील. पण सत्य तर हे आहे की, असे कधी होणार नाही. आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही या देशाचे आहोत.

बांसवाडामध्ये पंतप्रधान मोदींचा दावा काय

राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानुसार देशातील संपत्तीवर पहिला अधिका मुसलमानांचा आहे, असा दावा पीएम मोदींनी केला होता. आता काँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती मुसलमानांमध्ये वाटण्यात येईल. ही शहरी नक्षल मानसिकता आई-बहिणींचे मंगळसूत्र पण सोडणार नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;