महायुतीत मुंबईतील या 2 जागांचा सस्पेंस कायम, कोणामध्ये होणार टक्कर?

महायुतीत मुंबईतील या 2 जागांचा सस्पेंस कायम, कोणामध्ये होणार टक्कर?

Loksabha election : उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम आमने-सामने आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी उज्ज्वल निकमांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे उत्तर पश्चिममध्ये लेकाविरोधात वडील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. तर महायुतीकडून उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम आमनेसामने आहेत. उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उज्ज्वल निकमांना मैदानात उतरवल्यानं दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे, दरम्यान उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिल्यानंतर लोकांना एक चांगला पर्याय मिळाल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.

उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त नाराज असल्याची देखील चर्चा होती. मात्र, वर्षा गायकवाडांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रिया दत्त मोठ्या बहिणीसारख्या त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महायुतीतला उत्तर मध्य मुंबईचा तिढा सुटलाय. मात्र, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल किर्तीकरांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये. उत्तर पश्चिम मुंबईमधून महायुतीचा उमेदवार ठरला नसला तरी पुत्र अमोल किर्तीकरांविरोधात गजानन किर्तीकरांनी दंड थोपटले आहेत. माझा पक्ष शिवसेना असून महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतून तर अनिल देसाई आणि राहुल शेवाळेंनी दक्षिण मध्य मुंबईतून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचं आव्हान असणार आहे.

दक्षिण मुंबईमधून ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात आहेत.. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा असून उद्या त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;