उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला?, कोणता डाव होता?; संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला?, कोणता डाव होता?; संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज एकमोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लावणे हा राजकारणाचा एक भाग होता. उद्धव ठाकरे यांना भावनिक करून राजीनामा द्यायला लावण्याचा आणि नंतर भाजपसोबत जाण्याचा शरद पवार यांचा डाव होता. सर्व राजकारण शरद पवार यांनी केलं. त्यांना संजय राऊत यांचा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट करतानाच संजय राऊत हा कुणाचा माणूस विचारले तर ते शरद पवार यांचा माणूस आहे असं म्हणणार. देवेंद्र फडणवीस हा नेता यांना भारी पडला म्हणून यांची पोटदुखी आहे. सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात, असं संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद करताना हा दावा केला. राम मंदिर बनले याचे यांना समाधान नाही.त्यांना दुःख यांचे आहे की, जमिनीचे व्यवहार झाले असतील, आम्हाला न विचारता कसे झाले? असे त्यांना वाटत असेल. गर्व से कहो हम हिंदू है ही बाळासाहेबांची गर्जना विसरले. मुंबई तोडण्याची भाषा यांना निवडणूक आल्यावरच समजते. चुकीच्या गोष्टी बिंबवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

याचा अर्थ मोदींचं महत्त्व वाढलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिले आहे. मोदी सहा सभा घेत आहेत, याचा आनंद माना. मोदी सभा घेतात याचा अर्थ महाराष्ट्राचे महत्त्व वाढले आहे. महाराष्ट्र देशात नंबर एक असेल, असं त्यांनी सांगितलं. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलं आहे. आरक्षणाबाबत हेच सरकार चांगला निर्णय घेऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

शाह, राज ठाकरेंची सभा

राज्यात अमित शाह यांचीही सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सभा घेत आहेत. येत्या 10 तारखेला राज ठाकरे यांचीही सभा घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवार म्हणाले, आमचं पत्र तयार आहे

शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यांनी शिवसेना सोबत नको असं सांगितलं होतं. पण अमित शाह यांनी तसं करण्यास नकार दिला होता. शिवसेनेसोबत आमची कमिटमेंट आहे, असं शाह यांनी पवारांना सांगितलं होतं. तुमचं बहुमत होत नसेल तर आमचे पत्र तयार आहे, असं पवारांनी सांगितलं होतं. पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत शिवसेना फोडण्याचं काम करत होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;