उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत फोन केला अन् म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत फोन केला अन् म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडावेळी नेमकं काय घडलं होतं याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना आमदार सुरतला गेल्यावर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत फोन लावला. दिल्लीतील भाजप नेत्यांशी संवाद साधला. यांना कशाला घेता? आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफरच उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडावेळच्या परिस्थितीवर भाष्य केलं. आम्ही बोलत बोलत गेलो. आम्ही लपूनछपून गेलो नाही. जाहीरपणे गेलो. परत बोलवायचं आणि आमचे पुतळे जाळायचे. पक्षातून हकालपट्टी करायची. दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करायची. यांना कशाला घेताय आम्हीच येतो तुमच्यासोबत, असं सांगायचं. असा प्रकार त्यावेळी घडला होता, असं सांगतानाच शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं ते थांबवण्यासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. पाऊल टोकाचं आणि धाडसाचं होतं. त्याला हिंमत लागते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांनी युती तोडली, आम्ही पूर्ण केली

भाजपसोबत आमची वैचारिक युती होती. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्या प्रयत्नाने ही युती झाली. ती युती आम्ही पुन्हा केली. यांनी तोडली होती. त्यांनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मला मोह नाही

मी साधा सरळ माणूस आहे. मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा मोह कुणाला? खोक्याचा मोह कुणाला? हे जनता जाणते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंच नव्हतं ना. ते म्हणत होते की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. शिवसैनिकाला पालखीत बसवायचं आहे. पण जेव्हा स्वत:चा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिकांची किंमत नसते. मला पदाची आणि सत्तेची हाव नव्हती. मला संधी मिळाली. त्याचं मी सोनं करतोय, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;