CSMT जवळ लोकलचा डबा घसरला, वाहतूक विस्कळीत

CSMT जवळ लोकलचा डबा घसरला, वाहतूक विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ (CSMT) लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पनवेलहून सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा दुपारी ११.३० च्या सुमारास घसरल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनजवळ पनवेल लोकलचा डबा घसरला. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही.

मात्र लोकलचा डबा घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून या मार्गावरील काही लोकल मस्जिदपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत. यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. वडाळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून ऐन उन्हात प्रवाशांना खाली उतरून ट्रॅकवरून चालत प्रवास करावा लागत आहे.

मेन लाईनच्या वाहतुकीवर परिणाम नाही 

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून हा डबा बाजूला काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो. या घटनेचा मेन लाइनवरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेल नाही. मात्र हार्बरवरील प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या हा डबा ट्रॅकवर वाहतूकक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन व अधिकारी अविरत प्रयत्न करत आहेत. हा डबा नेमका कसा घसरला , त्याचे कारण काय हे नंतर चौकशीतून समोर येईल. आणखी १ ते दीड तासात ही वाहतूर सुरळीत होऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

 

ही बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;