नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर सभा झाली. शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सासवडमधील पालखी मैदानावर ही सभा झाली. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपच्या ध्येय धोरणांवर शरद पवार यांनी टीका केली.

मोदींवर टीकास्त्र

नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार अशी भाषणाला सुरुवात करतील. दिल्लीत सांगतात की शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत केली. बारामतीत येऊन म्हणतात बोट धरून आलो, असं सांगतात आणि 8 महिन्यात निवडणुकीमध्ये वेगळं भाषण करतात. भाषणात सातत्य असलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही, असं शरद पवार म्हणाले.

“यांना संविधान बदलायचंय”

पुरंदरमधील लोकांनी नेहमी साथ देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या का? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. 400 पार करण्याचा अर्थ असा आहे त्यांना वाटेल ते त्यांना करायचा आहे. त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदींची धोरण काय आहेत यातून कळते, त्यामुळे अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे, असं म्हणत पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

“मोदी लोकशाही उध्वस्त करणार”

नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू. नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आपली खून आहे. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आमची आहे, असं म्हणत शरद पवार यांनी स्थानिकांना संबोधित केलं.

बांगलादेश सारखा देश आपल्यापेक्षा पुढे आहे. अशोक चव्हाण यंच्यावर आरोप केलं ते भाजपसोबत गेले. भोपाळमध्ये भाषण केले बँक आणि इरिगेशन मध्ये घोटाळा केला असता आरोप केला. ज्यांच्यावर आरोप केले ते आज कुठं आहेत? झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं, असं शरद पवारांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;