पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

दूषित पाणी पुरवठा करण्याचे पाप पालिकेने थाबावावे : नाना काटे

पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर आज दि.२१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी  मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला.

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजुदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर सोमवारी (दि.21) मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आल्याचे दिसले. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आ

हे. शहरासाठी वरदायनी असणाऱ्या पवनामाई नदीची दुरवस्था झाली असून प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिकेकडे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
 
याबाबत काटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पवना नदीत वारंवार फेसाळत आहे. महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करते. पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये. जुलै महिन्यात पवना नदी पात्रता असाच फेस आला होता. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. नदीत वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणे, केमिकलने माखलेले कपडे, वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत.

शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत तिन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाय योजना तातडीने कराव्यात. 
- नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;