अर्धवट मेट्रो प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; सिटीजन फोरमकडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध

अर्धवट मेट्रो प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; सिटीजन फोरमकडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत मेट्रो सुरू झाली असली, तरी मेट्रो स्थानकांवर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा नाही. सल्ल्याने पार्किंगची सोय करावी. मेट्रोची फिडर सेवा सक्षम करावी, अर्धवट मेट्रो म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराने जनसंवाद सभा घ्याव्यात, कचरा व्यवस्थापनासाठी धोरण राबवावे, केवळ स्मार्ट सिटीच्या मागे न लागता शहरे राहण्याजोगी असायला हवीत, यांसह विविध मागण्यांचा पिंपरी- चिंचवड सिटीजन फोरमच्या वतीने जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. निवडणुकीला सामोरे जात असतानाच, सर्व राजकीय पक्षांकडून नागरिकांना विविध आश्वासने दिली जात आहेत. मात्र, जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, याबाबत पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमकडून नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राजीव भावसार, तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान, गणेश बोरा, आनंद पानसे उपस्थित होते. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांत लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला नागरिकांचा जाहीरनामा दिला जाणार आहे. त्याचबरोबर जो उमेदवार निवडून येईल, त्याने या जाहीरनाम्यातील सर्वसामान्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

फोरमने जाहीरनाम्यात शहराला गेल्या सव्वा चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा कसा मिळेल, ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय धोरण, असंघटित घटकांतील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र पेन्शन योजना सुरू करावी, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावेत, अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध करावा, प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, नदी सुधार प्रकल्प सक्षमपणे राबवावा. एसटीपी आणि ईटीपी कायमस्वरूपी राहण्यासाठी ठोस दीयो का कारस्वत पुसायाच्या साठी मार्गावर सध्या बहुतांश स्थानकांवर कामे सुरू आहेत. पुणे- लोणावळा मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या कामांमधील बहुतांश भाग पाडावा लागणार आहे. ही सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आहे. त्यामुळे भविष्यातील योजनांचा विचार करून पावले उचलायला हवीत, हेही मुद्दे मांडले आहेत.

दरम्यान, चाकण ते नाशिक फाटा, तळेगाव स्टेशन ते चाकण, तळवडे आयटी पार्क ते हिंजवडी आयटी पार्क, भीमा कोरेगाव ते वाघोली या मार्गावर मेट्रो विस्तारित करावी, शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धन करून पर्यटनाला चालना द्यावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अम्मी लागली मागे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमवर आणखी एका बाळासाठी… अम्मी लागली मागे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमवर आणखी एका बाळासाठी…
दीपिका कक्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर शोएब...
लग्नाला सात वर्षे पूर्ण, ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली आई बनण्याची इच्छा, म्हणाली, आता..
The Family Man season 3: ‘द फॅमिली मॅन 3’ बाबतची मोठी अपडेट आली समोर
…म्हणून रणवीर सिंगने हटवले लग्नाचे फोटो, वाचा बातमी
वाढवणवासीयांचा महायुतीवर बहिष्कार, सदैव पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीलाच मतदान करणार!
अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर शुक्रवारी होऊ शकतो निर्णय
नांदेड – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना अटक