Manipur violence : मतदान संपताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, CRPF चे दोन जवान शहीद

Manipur violence : मतदान संपताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, CRPF चे दोन जवान शहीद

मणिपूरमधील दोन जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा हिंसाचार भडकला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कुकी उग्रवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर घात लावून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले असून अनेक जखमी झाले आहेत. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान मणिपूरच्या विष्णूपूर जिल्ह्यातील नारनसेना भागामध्ये तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या 128व्या बटालियनचे सदस्य होते.

तत्पूर्वी उग्रवाद्यांनी कांगपोकपी, उखरूल आणि इम्फाळ पूर्व भागामध्ये गोळीबार केला. या गोळीबारामध्ये कुकी समाजाच्या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर थौबल जिल्ह्यातील हेइरोक आणि तैंगनौपाल येथेही गोळीबाराची घटना घडली आणि त्यानंतर हिंसाचार भडकला.

सर्वाधिक मतदान

शुक्रवारी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. एकूण 88 जागांवर झालेल्या या निवडणुकीत मणिपूरच्या एका जागेचाही समावेश होता. आउटर मणिपूर जागेसाठी एकूण 77.30 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे उग्रवाद्यांनी धमकावल्यानंतरही लोकं मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले आणि सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असे मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रदीप कुमार झा यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला.

19 एप्रिलला इनर मणिपूरमध्ये मतदान

मणिपूरमध्ये इनर मणिपूर आणि आऊटर मणिपूर अशा लोकसभेच्या दोन जागा आहेत. आऊटर मणिपूरमध्ये 26 एप्रिलला मतदान पार पडले, तर इनर मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान झाले. इनर मणिपूरमध्ये जवळपास 78.78 टक्के मतदान झाले. यादरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे 22 एप्रिल रोजी 11 मतदान केंद्रावर पुर्नमतदान झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन