नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार, पण महायुतीत तिढा कायम, भुजबळांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचा पुन्हा दावा
लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्पातील मतदानास सुरुवात झाली आहे. त्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा निर्णय होत नाही. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार वेगाने सुरु आहे. परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी की शिवसेना कोण जागा लढवणार? हा निर्णय होत नाही. नाशिक लोकसभेच्या जागेचा महायुतीतील तिढा कायम आहे. यामुळे उमेदवारास प्रचारास कमी वेळ मिळणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आपण माघार घेत असल्याचे मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. परंतु आता राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला आहे.
राष्ट्रवादीची बैठक, पुन्हा केला दावा
नाशिक लोकसभेच्या जागे संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाची तातडीची बैठक गुरुवारी झाली. परंतु महायुतीकडून अद्यापही नाशिक लोकसभेत उमेदवार नाही. आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर उमेदवारी जाहीर झालेली नाही. नाशिकमधील जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर अजूनही निर्णय जाहीर झालेला नाही.
नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का
नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का बसला आहे. नाशिकमधील दिंडोरमध्ये भारती प्रवीण पवार भाजपकडून निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे रिंगणात आहे. परंतु माकपचे माजी आमदार जे. पी. गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ते माकपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला आहे.
दिंडोरीमध्ये तिरंगी लढत
दिंडोरी लोकसभेत जे. पी. गावित निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. महायुतीच्या भारती पवार विरुद्ध मविआचे भास्कर भगरे माकपचे जे. पी. गावित अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतरही जे.पी. गावित निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. दिंडोरी लोकसभेत जे पी गावित यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे. तसेच या मतदार संघात वंचितच्या उमेदवाराचेही आव्हान असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List