लोकसभा निवडणूक 2024: विदर्भातील 8 जागांसह देशातील 88 जागांवर मतदान, महाराष्ट्रातील 204 उमेदवारांचा भाग्य होणार सीलबंद

लोकसभा निवडणूक 2024: विदर्भातील 8 जागांसह देशातील 88 जागांवर मतदान, महाराष्ट्रातील 204 उमेदवारांचा भाग्य होणार सीलबंद

महाराष्ट्रातील ८ जागांसह देशातील ८८ जागांवर आज मतदान सुरु झाले. विदर्भात ८ जागांवर २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज होणाऱ्या ८ लोकसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी उमेदवार अकोल्यात आहेत. याठिकाणी १५ उमेदवार नशीब अजमवत आहेत. देशभरातील १२०२ उमेदवारांचा फैसला आज सीलबंद होणार आहे. काही उमेदवारांनी पूजा अर्चाकरुन सकाळीच मतदान केले. अकोलामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आपल्या घरून औक्षवंत करून मतदानासाठी निघाले आहेत. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी घरी पूजा करून शहरातील विविध मंदिरामध्ये दर्शन घेतले.

उन्हामुळे मतदान केंद्रावर मंडप लागले

राज्यातील दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणुकीच मतदान आज पूर्ण होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक बूथ केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. वाढते तापमान लक्षात घेता ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मंडप टाकून सावलीची व्यवस्था केली आहे. तसेच लहान मुलांसाठी पाळणा व इतर खेळण्याची व्यवस्था केली. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात एकूण ६ लाख ६४ हजार ३०८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे.

८९ ऐवजी ८८ जागांवर मतदान

देशातील ८८ जागांसाठी १५.८८ कोटी मतदार मतदान करणार आहे. उष्णेतीची लाट लक्षात घेऊन बिहारमधील चार मतदार संघात मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. देशात ८९ मतदार संघात मतदान होणार होते. परंतु मध्य प्रदेशातील बेतूलमध्ये बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या टप्प्पात मतदान होणार आहे. यामुळे देशात दुसऱ्या टप्प्यात ८९ ऐवजी ८८ मतदार संघात मतदान होणार आहे.

हे आहेत हायप्रोफाईल उमेदवार

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक हायप्रोफाईल उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात राहुल गांधी, एनी राजा, शशी थरूर, नवनीत राणा, ओम बिर्ला, हेमामालिनी, अरुण गोविल, प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान पाचव्या टप्प्यासाठी अधिसूचना आज जारी होत आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;